Hyundai Creta Facelift Booking: बुकिंग सुरू, २५,०००/- रुपये भरून बुक करा नवीन क्रेटा

Hyundai Creta Price in India

Hyundai Creta Facelift Booking: भारतीय बाजारपेठेत Hyundai ने त्यांच्या Creta फेसलिफ्ट मॉडेलचं अधिकृतपणे बुकिंग सुरू केलं आहे. Hyundai Creta Facelift मॉडेलचं अनावरण १६ जानेवारी २०२४ ला भारतीय बाजारात होणार आहे.

हे फेसलिफ्ट मॉडेल आंतरराष्ट्रीय स्तरावर विकल्या जाणाऱ्या मॉडेल पेक्षा वेगळे असणार आहे. Hyundai Motors ने नवीन Creta फेसलिफ्ट च्या इंटीरियर आणि एक्सटीरियरबद्दल माहिती जाहीर केली आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) एकूण सात व्यापक मॉडेलमध्ये ऑफर केले जाईल: E, EX, S, S (O), SX, SX Tech आणि SX (O). भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट SUV ला खूप मागणी आहे आणि या सेगमेंटमध्ये Hyundai Creta ला सर्वाधिक पसंती ग्राहकांकडून मिळालेली आहे.

Hyundai Motors ने जाहीर केल्याप्रमाणे तुम्ही नवीन ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मॉडेल साठी जवळच्या डीलर कडे जाऊन किंवा ऑनलाइन वेबसाइटद्वारे २५,०००/- रुपये भरून या मॉडेलचं बुकिंग करू शकता. २०२४ च्या २ टप्प्यात Hyundai Creta फेसलिफ्ट मॉडेलची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) मध्ये वाहनाच्या आकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही परंतु डिझाइन मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. फ्रंट आणि बॅक प्रोफाइल मध्ये बदल करण्यात आले आहेत. फ्रंट ग्रिलसह नवीन कनेक्टेड LED DRL लाईट युनिट बसवण्यात आले आहे. बॅक प्रोफाइल मध्ये नवीन बंपर सह नवीन कनेक्टेड LED टेल लाईट युनिट देण्यात आले आहे. सोबतच नवीन ड्युअल टोन डायमंड कट अलॉय व्हील देण्यात आले आहेत. सध्या बाजारात असलेल्या ह्युंदाई क्रेटा पेक्षा नवीन ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मॉडेल दिसायला जास्त छान असणार आहे.

Hyundai Creta Facelift Booking

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये कुठले सेफ्टी फिचर्स असणार आहेत? Hyundai Creta Features

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) च्या इंटीरियर मध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या ह्युंदाई क्रेटा पेक्षा नवीन मॉडेलचे इंटीरियर विविध गोष्टींनी भरलेले असणार आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सह ड्रायव्हर डिस्प्ले सुद्धा डिजिटल असणार आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले ची सुविधा दिली जाणार आहे. नवीन ह्युंदाई क्रेटा चा डॅशबोर्ड लेआउट आणि सेंटर कन्सोल सुद्धा प्रीमियम दिला गेला आहे. वायरलेस मोबाइल चार्जिंग आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोलचा देखील यात समावेश आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये ३६० डिग्री कॅमेरा देखील मिळणार आहे. मागच्या सीट वर बसणाऱ्या प्रवाश्यांसाठी एसी व्हेंट दिले जाणार आहेत. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ला एक मोठा पॅनोरामिक सनरूफ देखील असणार आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) मध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षेवर देखील भर दिला गेला आहे. ७ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) चा या मध्ये समावेश आहे.
सोबतच ADAS तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. ADAS चा उपयोग समोरील बाजूस किंवा मागील बाजूस वाहनांची टक्कर होऊ नये या साठी होतो. ADAS मध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीपिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेन्शन अलर्ट, रीअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ट्रॅफिक जॅम असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि बरेच काही फिचर्स समाविष्ट असतात.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट किती इंजिन मध्ये उपलब्ध असणार? Hyundai Creta Engine?

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) तीन इंजिन पर्यायांसह भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहेत. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, १.५ लिटर डिझेल इंजिन आणि १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. सर्व इंजिन पर्यायांना सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. सोबतच सहा-स्पीड iMT आणि AT (ऑटोमॅटिक) असणार आहे. त्याचबरोबर ७ स्पीड चा DCT गिअरबॉक्स मिळणार आहे.

१.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ११५ PS ची पॉवर आणि १४४ NM टॉर्क जनरेट करेल. १.५ लिटर डिझेल इंजिन ११५ PS च्या पॉवर सह आणि २५० NM टॉर्क जनरेट करेल. १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १६० PS ची पॉवर आणि २५३ NM टॉर्क जनरेट करेल.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ची किंमत किती? Hyundai Creta Price in India

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) ची किंमत 11 लाख ते 18 लाख रुपये एक्स-शोरूम असण्याची शक्यता आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ची टक्कर भारतीय बाजारात मारुती ग्रँड विटारा, किया सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशक आणि सिट्रोएन सी3 एअरक्रॉस यांच्या सोबत होणार आहे.

FAQ:

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट किती इंजिन मध्ये उपलब्ध असणार? Hyundai Creta Engine?

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) तीन इंजिन पर्यायांसह भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहेत. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, १.५ लिटर डिझेल इंजिन आणि १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. सर्व इंजिन पर्यायांना सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. सोबतच सहा-स्पीड iMT आणि AT (ऑटोमॅटिक) असणार आहे. त्याचबरोबर ७ स्पीड चा DCT गिअरबॉक्स मिळणार आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये कुठले सेफ्टी फिचर्स असणार आहेत? Hyundai Creta Safety features?

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) मध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षेवर देखील भर दिला गेला आहे. ७ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) चा या मध्ये समावेश आहे.
सोबतच ADAS तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. ADAS चा उपयोग समोरील बाजूस किंवा मागील बाजूस वाहनांची टक्कर होऊ नये या साठी होतो.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ची किंमत किती? Hyundai Creta Price in India

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) ची किंमत 11 लाख ते 18 लाख रुपये एक्स-शोरूम असण्याची शक्यता आहे.

हे वाचा: New Maruti EVX: मारुती सुझुकीची नवीन EVX, एका चार्जमध्ये ५५० किमीची रेंज

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment