Tata punch EV: भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Tata ची नवीन इलेक्ट्रिक कार सज्ज, बुकिंग झाली सुरु!

Tata Punch EV Price in India

Tata punch EV: टाटा मोटर्सने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी “टाटा पंच ईवी” च्या रूपाने नवीन कार बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे “टाटा पंच ईवी” हि कार टाटाच्या नवीन Gen 2 EV प्लॅटफॉर्मवर बनलेली पहिली कार असणार आहे. कंपनी कडून या प्लॅटफॉर्म ला Acti.ev असे नाव देण्यात आले आहे.

टाटा मोटर्सची “टाटा पंच ईवी” हि चौथी इलेक्ट्रिक कार आणि दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे. “टाटा पंच” ला लोकांची पसंती नेहमीच राहिली आहे. परंतु जे ग्राहक टाटा पंच च्या इलेक्ट्रिक मॉडेल ची वाट बघत होते अश्या ग्राहकांसाठी हि आनंदाची बातमी आहे.

टाटा मोटर्सने या नवीन “टाटा पंच ईवी” च्या बुकिंगला देखील सुरुवात केली आहे. तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये जाऊन किंवा टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन हि कार तुम्ही बुक करू शकता. बुकिंग साठी तुम्हांला २१,०००/- रुपये टोकन म्हणून भरावे लागणार आहेत.

टाटा मोटर्स च्या या आधीच्या कार मध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी पॅकच्या ऊर्जा घनतेमध्ये १० टक्के सुधारणा करण्यात आल्याचं टाटा मोटर्स कडून सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे बॅटरी च्या क्षमतेनुसार हि कार ३०० ते ६०० किलोमीटर ची रेंज देणार आहे. नवीन प्लॅटफॉर्ममुळे AWD, RWD आणि FWD पर्यायांना आणि AC फास्ट चार्जिंगसाठी ७.२ kW ते ११ kW ऑनबोर्ड चार्जर आणि १५० kW पर्यंत DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. टाटा मोटर्सच्या मते नवीन प्लॅटफॉर्ममुळे GNCAP आणि BNCAP सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे अधिक सोपे जाणार आहे.

Tata Punch EV Interiors & Features

Tata Punch EV Exterior

टाटा पंच ईवी चे डिझाइन नवीन Nexon EV सारखी करण्यात आली आहे. पहिल्या नजरेत तुम्हांला हि Nexon EV च लहान वर्जन असल्याचा फील येतो. पुढच्या बाजूला बंपर आणि ग्रील ला सध्याच्या टाटा पंच पेक्षा वेगळे करण्यात आले आहे. पुढच्या बाजूला चार्जिंग सॉकेट देण्यात आला आहे. हेडलॅम्प ची मांडणी देखील Nexon EV सारखी ठेवण्यात आली आहे. बंपर चा खालचा भाग देखील नवीन करण्यात आला आहे ज्यामध्ये क्लॅडिंगवर नवीन उभ्या स्ट्रोक आणि सिल्व्हर फॉक्स स्किड प्लेट बसवण्यात आल्या आहेत.

मागच्या बाजूला देखील नवीन बंपर सोबतच रूफ माउंटेड स्पॉयलर आणि ब्रेक लाईट च्या डिझाइन मध्ये बदल करण्यात आला आहे. टाटा पंच ईवी चे १६ इंचाचे अलॉय व्हील तिच्या नवीन लुक मध्ये अजून भर टाकत आहेत. नवीन टाटा पंच ईवी मध्ये चारही व्हील ला डिस्क ब्रेक मिळणार आहे.

टाटा पंच ईवी इंटिरियर्स – Tata Punch EV Interiors & Features

टाटा पंच ईवी इंटिरियर्स मध्ये देखील वेगळे पण ठेवण्यात आले आहे. टॉप मॉडेलमध्ये १०.२५ इंचाचा इंफोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. सध्याच्या नवीन टाटा SUV मध्ये देण्यात आलेलं इल्युमिनेटेड टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील टाटा पंच ईवी मध्ये देण्यात आले आहे. कमी किमतींच्या व्हेरियंटमध्ये ७.० इंचाचा इंफोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात येणार आहे. टॉप मॉडेलमध्ये ३६० डिग्री कॅमेरा देखील मिळणार आहे. सोबतच आधुनिक फिचर्स जसे कि ऑटो होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, सनरूफ आणि पुढच्या सीट व्हेंटिलेटेड मिळणार आहेत. ADAS सुद्धा या नवीन टाटा पंच ईवी मध्ये मिळणार आहे. टाटा पंच ईवी मध्ये ६ एअरबॅग सोबतच ABS आणि ESC असणार आहे.

Tata Punch EV Interiors & Features

टाटा पंच ईवी Smart, Smart+, Adventure, Empowered and Empowered+ अश्या पाच व्हेरियंट मध्ये येणार आहे. Smart, Smart+ लाँग रेंज व्हेरियंट मध्ये उपलब्ध नाही त्यामुळे लाँग रेंज व्हेरियंट साठी तुम्हांला Adventure, Empowered and Empowered+ हे तीन पर्याय निवडावे लागतील. ड्युअल-टोन पेंट पर्याय देखील टाटा पंच ईवी उपलब्ध असणार आहेत.

टाटा पंच ईवी किंमत – Tata Punch EV Price in India

“टाटा पंच ईवी” ची बुकिंग जरी सुरु करण्यात आली असली तरी टाटा मोटर्स ने या नवीन कारच्या किंमतींची घोषणा केलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट आणि तज्ञांच्या मते “टाटा पंच ईवी” ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख ते 13 लाख दरम्यान असू शकते. “टाटा पंच ईवी” ची ऑन-रोड किंमत तुम्ही राहत असलेल्या भागात वेग वेगळी असू शकते.

टाटा पंच ईवी कधी भारतीय बाजारात येणार – Tata Punch EV Launch Date in India

टाटा पंच ईवी भारतीय बाजारात १५ फेब्रुवारी २०२४ ला लॉन्च केली जाणार आहे. टाटा पंच ईवी ची भारतीय बाजारात स्पर्धा Citroen EC3 सोबत होणार आहे. Tiago EV MR आणि Nexon EV MR च्या मधली पोकळी भरून काढण्याचं काम Tata Punch EV करणार आहे.

टाटा पंच ईवी तिच्या आकर्षक आणि स्टायलिश डिझाइनसह इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात लक्ष वेदी ठरणार यात काही शंका नाही. जर तुम्ही परवडणारी इलेक्ट्रिक SUV शोधत असाल तर टाटा पंच ईवी सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल.

FAQ:

टाटा पंच ईवी बुकिंग किंमत? Tata Punch EV booking price?

टाटा मोटर्सने या नवीन “टाटा पंच ईवी” च्या बुकिंगला देखील सुरुवात केली आहे. तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये जाऊन किंवा टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन हि कार तुम्ही बुक करू शकता. बुकिंग साठी तुम्हांला २१,०००/- रुपये टोकन म्हणून भरावे लागणार आहेत.

टाटा पंच ईवी कधी भारतीय बाजारात येणार ? Tata Punch EV Launch Date in India?

टाटा पंच ईवी भारतीय बाजारात १५ फेब्रुवारी २०२४ ला लॉन्च केली जाणार आहे. टाटा पंच ईवी ची भारतीय बाजारात स्पर्धा Citroen EC3 सोबत होणार आहे. Tiago EV MR आणि Nexon EV MR च्या मधली पोकळी भरून काढण्याचं काम Tata Punch EV करणार आहे.

टाटा पंच ईवी किंमत ? Tata Punch EV Price in India?

“टाटा पंच ईवी” ची बुकिंग जरी सुरु करण्यात आली असली तरी टाटा मोटर्स ने या नवीन कारच्या किंमतींची घोषणा केलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट आणि तज्ञांच्या मते “टाटा पंच ईवी” ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख ते 13 लाख दरम्यान असू शकते. “टाटा पंच ईवी” ची ऑन-रोड किंमत तुम्ही राहत असलेल्या भागात वेग वेगळी असू शकते.

हे वाचा: Hyundai Creta Facelift Booking: बुकिंग सुरू, २५,०००/- रुपये भरून बुक करा नवीन क्रेटा

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment