Free OTT Apps: तुम्हांला विनामूल्य चित्रपट आणि वेब सीरिज पाहायच्या आहेत का?

Free OTT Apps

Free OTT Apps: स्मार्टफोन च्या जमान्यात मोबाईल वरूनच बरेच चित्रपट किंवा वेब सिरीज जास्त प्रमाणात बघितले जातात. चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग बराच आहे. परंतु सध्या बरेच चित्रपट चित्रपट गुहांमध्ये रिलीज न करता OTT ॲप वर प्रदर्शित केले जातात. त्यामुळे OTT ॲपकडे लोकांचा कल वाढत आहे.

ऑफिस ला किंवा कॉलेज ला जाताना किंवा घरी परतत असताना बरेच लोक अश्या OTT ॲपचा वापर करताना आपल्याला दिसून येते. परंतु बरेच OTT ॲप हे पैसे भरून सबस्क्रिप्शन घ्यावे लागतात. सगळ्यांनाच असे पैसे भरून सबस्क्रिप्शन घेता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा लोकांचा हिरमोड होतो. आम्ही आमच्या वाचकांसाठी असे काही OTT ॲप घेऊन आलो आहोत जे तुम्ही एकही पैसे खर्च न करता विनामूल्य (Free OTT) सबस्क्रिप्शन मिळवू शकता. त्यासाठी काही अटी आहेत ज्यांचे पालन केल्यास तुम्हांला नवीन चित्रपट आणि वेब सीरिज मोफत बघता येतील.

जाणून घेऊया विनामूल्य OTT (Free OTT) प्लॅटफॉर्म कोणते आहेत ते.

तुबी – Tubi

तुम्हांला जर हॉलिवूड चित्रपट किंवा मालिका बघायची आवड असेल तर Tubi ॲप तुम्हांला नक्की आवडेल. Tubi ॲप चे ३३ दशलक्ष यूजर्स जगामध्ये आहेत. Tubi ॲप २०१४ साली लॉन्च करण्यात आले आहे. हॉलिवूडचे बरेच चित्रपट या Tubi ॲप तुम्हांला पाहायला मिळतील. Google Play Store आणि Apple App Store या दोन्हीवर हे Tubi ॲप तुम्हांला उपलब्ध आहे. Tubi ॲप डाउनलोड करून मोफत योजना हा पर्याय निवडा आणि तुमच्या मनपसंद हॉलिवूड चित्रपट किंवा मालिकाचा मनमुराद आनंद घ्या.

जिओ सिनेमा – Jio Cinema

जिओ सिनेमा या OTT ॲप वर तुम्ही वेग वेगळ्या भाषेतील वेब सिरीज पाहू शकता सोबतच बॉलिवूड, हॉलीवूड आणि मराठी, बंगाली, तेलगु, तामिळ, केरळी आणि इतर भाषेतील चित्रपट पाहू शकता. जिओ सिनेमा हे OTT ॲप विनामूल्य (Free OTT) वापरण्यासाठी तुमच्याकडे JIO चा नंबर असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे असलेल्या JIO नंबरचा वापर करून तुम्ही या प्लॅटफॉर्म वरचे सर्व चित्रपट आणि वेब सिरीज मोफत मध्ये बघू शकाल. तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Store किंवा Apple App Store वरून Jio Cinema ॲप डाउनलोड करून लॉगिन करताना तुमच्या जवळचा JIO नंबर ने लॉगिन करा. जर तुमच्याकडे JIO नंबर नसेल तर तुमच्या जवळच्या मित्रपरिवाराचा नंबर तुम्ही वापरू शकता.

एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले – Airtel Xstream Play

Airtel Xstream Play ॲप चा वापर करून तुम्ही चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही मालिका आणि क्रीडा यांचा आनंद लुटू शकता. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले ॲप वापरण्यासाठी प्रीपेड/पोस्टपेड/ब्रॉडबँड/डीटीएच या पैकी कुठलंही एअरटेल कनेक्शन असणे आवश्यक आहे. तुमच्या डिव्हाइसवर Airtel Xstream ॲप डाउनलोड करून तुमचा प्रीपेड/पोस्टपेड एअरटेल मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा आणि कोणताही एक ओटीटी मोफत पहा (Free OTT). Google Play Store आणि Apple App Store या दोन्हीवर हे Airtel Xstream Play ॲप तुम्हांला उपलब्ध आहे.

वूट – Voot

Voot OTT ॲप Viacom18 च्या मालकीची आहे. Voot OTT ॲप वर कलर्स टीव्हीच्या सर्व मालिका तुम्हांला पाहायला मिळतात. Google Play Store आणि Apple App Store या दोन्हीवर हे Voot ॲप तुम्हांला उपलब्ध आहे. Voot OTT ॲप डाउनलोड करून तुम्हांला मोफत योजना हा पर्याय निवडायचा आहे. Voot ॲप मुळे तुम्ही कधीही तुमच्या आवडीच्या मालिका बघू शकाल.

एमएक्स प्लेअर – MX Player

MX मीडिया आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मने विकसित केलेला MX Player एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे. MX Player या OTT ॲप वर तब्बल ११ भाषांमध्ये १,५०,००० तासांपेक्षा जास्तचे चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज आपल्याला बघायला मिळतील. MX Player चा मोफत (Free OTT) तुम्ही तुमच्या लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल फोन आणि इतर स्मार्ट डिव्हाइसवर आनंद घेऊ शकता. Google Play Store आणि Apple App Store या दोन्हीवर हे MX Player ॲप तुम्हांला उपलब्ध आहे.

वाय मॅक्स प्लस – Ymax Plus

Ymax Plus हे एक असे ॲप आहे ज्याचा वापर करून तुम्ही वेग वेगळ्या OTT ॲप वरचे चित्रपट आणि वेब सिरीज पूर्ण पणे मोफत (Free OTT) बघू शकाल. Ymax Plus हे ॲप तुम्हांला फक्त Google Play Store उपलब्ध आहे. किती दिवस हे ॲप चालेल हे माहित नाही परंतु सध्यातरी तुम्ही या ॲप वरून तुम्हांला आवडेल ते चित्रपट आणि वेब सिरीज बघू शकाल.

FAQ:

MX Player मोफत आहे का? Is MX Player free?

MX मीडिया आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मने विकसित केलेला MX Player एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे. MX Player या OTT ॲप वर तब्बल ११ भाषांमध्ये १,५०,००० तासांपेक्षा जास्तचे चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज आपल्याला बघायला मिळतील. MX Player चा मोफत (Free OTT) तुम्ही तुमच्या लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल फोन आणि इतर स्मार्ट डिव्हाइसवर आनंद घेऊ शकता.

हे वाचा: Allu Arjun Pushpa 2 Fees: अल्लू अर्जुनने “पुष्पा २” साठी मानधन घेतले नाही, परंतु तो कमवणार करोडो रुपये!

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment