OnePlus 12R: २६ मिनिटात फुल चार्ज, किंमत फक्त?

OnePlus 12R Display

OnePlus 12R: OnePlus ने त्यांचे दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात लॉन्च केले आहेत. वन-प्लस १२ ची माहिती आपण या आधीच्या आपल्या आर्टिकल मध्ये वाचली असेलच, जे कोणी नवीन वाचक असतील तर त्यांनी वन-प्लस १२ च आमचं ते आर्टिकल नक्की वाचा. वन-प्लस १२ च आर्टिकल वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नवीन आधुनिक फिचर्स ने OnePlus 12R फ्लॅगशिप स्मार्टफोन भरलेला आहे. वन-प्लस १२ प्रमाणेच वन-प्लस १२आर मध्ये काय काय नवीन फिचर्स दिले आहेत हे जाणून घेण्याची तुमची इच्छा असेलच तर यासाठीच आम्ही हे आर्टिकल घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात वन-प्लस १२आर मध्ये कंपनीने नवीन काय दिले आहे. 

वन-प्लस १२ आर डिस्प्ले – OnePlus 12R Display

वन-प्लस १२आर मध्ये ६.७८ इंचाचा गोरिला ग्लास (Gorilla Glass Victus 2) डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० Hz रिफ्रेश रेट सह LTPO4 AMOLED डिस्प्ले मध्ये १२६४ x २७८० चे रिझोल्यूशन वन-प्लस च्या या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. वन-प्लस १२ आर च्या या डिस्प्ले मध्ये ४५०० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे, त्यामुळे उन्हामध्ये देखील स्मार्टफोन वापरणे सोपे जाणार आहे. स्मार्टफोन त्वरित अनलॉक करण्यासाठी अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. OnePlus 12R ला IP65 रेटिंग असल्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे. 

वन-प्लस १२आर कॅमेरा – OnePlus 12R Camera

वन-प्लस १२आर चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल असून दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या फ्लॅगशिप फोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच १६ मेगापिक्सेल चा वाईड सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्ड 30/60fps मध्ये तर 1080p व्हिडिओ रेकॉर्ड 30/60/240/480fps मध्ये करता येणार आहे. 

तुम्हांला व्हिडिओ रेकॉर्ड करताना बरेच पर्याय या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये मिळणार आहेत. १६ मेगापिक्सेलच्या वाईड सेल्फी कॅमेऱ्याने सुद्धा 1080p व्हिडिओ रेकॉर्ड 30fps मध्ये करता येणार आहे.

OnePlus 12R Display

वन-प्लस १२ आर प्रोसेसर- OnePlus 12R Processor

OnePlus 12 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. वन-प्लस १२ आर चा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर १,५१८,५५२ आहे. गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. अल्ट्रा-फ्लॅगशिप CPU आणि 16GB पर्यंत रॅम मुळे हा स्मार्टफोन एक वेगळाच आनंद वापरताना देणार आहे.

वन-प्लस १२ आर बॅटरी आणि चार्जर – OnePlus 12R Battery & Charger

OnePlus 12R या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये ५५०० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत १००W चा चार्जर मिळणार आहे. या १००W च्या चार्जरला ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी २६ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. तर ५०W च्या  वायरलेस चार्जरला ० ते ५० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी ५५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. वन-प्लस १२ आर मध्ये १००W च्या चार्जर सोबत USB Type-C केबल देखील मिळणार आहे.

वन-प्लस १२ आर ची भारतात किंमत – OnePlus 12R Price in India

OnePlus 12R भारतीय बाजारात आला असून असून ८GB रॅम + १२८GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३९,९९९/- तर १६GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ४५,९९९/- ठेवण्यात आली आहे. वन-प्लस च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. जर तुमच्याकडे ICICI किंवा OneCard चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना १०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात.

वन-प्लस १२ आर भारतात लॉन्च होण्याची तारीख – OnePlus 12R Launch Date in India

OnePlus 12 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन २३ जानेवारी २०२४ ला भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ६ फेब्रुवारी २०२४ पासून वन-प्लस च्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन विक्री साठी उपलब्ध असणार आहे.

FAQ:

वन-प्लस १२आर कॅमेरा? OnePlus 12R Camera?

वन-प्लस १२आर चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल असून दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या फ्लॅगशिप फोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच १६ मेगापिक्सेल चा वाईड सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्ड 30/60fps मध्ये तर 1080p व्हिडिओ रेकॉर्ड 30/60/240/480fps मध्ये करता येणार आहे. १६ मेगापिक्सेलच्या वाईड सेल्फी कॅमेऱ्याने सुद्धा 1080p व्हिडिओ रेकॉर्ड 30fps मध्ये करता येणार आहे.

वन-प्लस १२ आर बॅटरी आणि चार्जर? OnePlus 12R Battery & Charger?

OnePlus 12R या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये ५५०० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत १००W चा चार्जर मिळणार आहे. या १००W च्या चार्जरला ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी २६ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. वन-प्लस १२ आर मध्ये १००W च्या चार्जर सोबत USB Type-C केबल देखील मिळणार आहे.

वन-प्लस १२ आर ची भारतात किंमत? OnePlus 12R Price in India?

OnePlus 12R भारतीय बाजारात आला असून असून ८GB रॅम + १२८GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३९,९९९/- तर १६GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ४५,९९९/- ठेवण्यात आली आहे. वन-प्लस च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. जर तुमच्याकडे ICICI किंवा OneCard चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना १०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात.

OnePlus 12R वॉटरप्रूफ आहे का? Is the OnePlus 12R waterproof?

हो, वन-प्लस १२ आर ला IP65 रेटिंग असल्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे. 

हे वाचा: Vivo X100 Pro: उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन, आता DSLR विसरा, किंमत?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment