Vivo X100 Pro: उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन, आता DSLR विसरा, किंमत?

Vivo X100 Pro Price in India

Vivo X100 Pro एक असा स्मार्टफोन जो तुमच्या अपेक्षेपलीकडे जाऊन वेगळा आनंद देतो. नाविन्यपूर्ण फिचर्स आणि तंत्रज्ञानाने भरलेला हा स्मार्टफोन जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर हे आर्टिकल नक्की वाचा. या आर्टिकल मध्ये आम्ही Vivo X100 Pro बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ज्यामुळे तुम्हांला तुमचा निर्णय घेताना उपयोग होईल. 

Vivo नेहमीच त्यांच्या स्मार्टफोन मध्ये नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञान घेऊन येत असते. Vivo चे स्मार्टफोन त्यांच्या कॅमेरा साठी देखील प्रसिद्ध आहेत. Vivo X100 Pro चा कॅमेरा तुम्हांला DSLR कॅमेरा विसरायला भाग पाडेल अश्या दर्जाचा देण्यात आला आहे. चला तर आर्टिकल ला सुरु करूयात. 

विवो X100 प्रो डिस्प्ले – Vivo X100 Pro Display

विवो X100 प्रो (Vivo X100 Pro) मध्ये ६.७८ इंचाचा Full HD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये १२० Hz रिफ्रेश रेट सह १२६० x २८०० चे रिझोल्यूशन मिळणार आहे. गरजेनुसार स्क्रीनच्या फ्रेम रेटचे स्मार्ट स्विचिंग या स्मार्टफोन मध्ये होणार आहे. विवो X100 प्रो च्या या डिस्प्ले मध्ये ३००० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे, त्यामुळे उन्हामध्ये देखील स्मार्टफोन वापरणे सोपे जाणार आहे. विवो X100 प्रो मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्ले वर देण्यात आला आहे.

विवो X100 प्रो कॅमेरा – Vivo X100 Pro Camera

विवो X100 प्रो चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल असून दुसरा कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो आणि तिसरा कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 

विवो X100 प्रो चा हा कॅमेरा ZEISS APO प्रमाणित (Certified) टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोन मधून काढलेले फोटोज् तुम्हांला एखाद्या DSLR ने काढल्यासारखे दिसतील. हा स्मार्टफोन IP68 डस्ट/वॉटर रेसिस्टंटसह येतो ज्यामुळे कुठल्याही वातावरणात तुम्ही चांगले फोटोज् काढू शकाल. विवो X100 प्रो मध्ये 8K व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे. सोबतच सिनेमॅटिक मोड देखील मिळणार आहे. ३२ मेगापिक्सेलच्या सेल्फी कॅमेऱ्याने 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे. 

विवो X100 प्रो प्रोसेसर- Vivo X100 Pro Processor

विवो X100 प्रो मध्ये MediaTek Dimensity 9300 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. विवो X100 प्रो चा हा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर २,२४९,८५८ आहे. या स्मार्टफोन मध्ये १६ GB रॅम देण्यात आली आहे. गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. विवो X100 प्रो मध्ये Android 14 तुम्हांला मिळणार आहे. 

विवो X100 प्रो बॅटरी आणि चार्जर – Vivo X100 Pro Battery & Charger

विवो X100 प्रो या स्मार्टफोन मध्ये ५४०० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत १००W चा चार्जर मिळणार आहे. या १००W च्या चार्जरला ० ते ५० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी १२ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. विवो X100 प्रो ५०W च्या  वायरलेस चार्जरला सपोर्ट करणार आहे. या स्मार्टफोन मध्ये USB Type-C केबल देखील मिळणार आहे. 

Vivo X100 Pro Launch Date in India

विवो X100 प्रो या स्मार्टफोन 2.4 GHz, 5.0 GHz आणि 6.0 GHz या वाय-फाय (Wi-Fi Version) ना सपोर्ट करणार आहे. विवो X100 प्रो ला IP68 रेटींग असल्यामुळे पाणी आणि धूळ यापासून हा स्मार्टफोन सुरक्षित राहणार आहे. ३० मिनिटांसाठी १.५m खोल पाण्यात हा स्मार्टफोन सुरक्षित असेल असा कंपनीचा दावा आहे.

विवो X100 प्रो ची भारतात किंमत – Vivo X100 Pro Price in India

विवो X100 प्रो (Vivo X100 Pro) भारतीय बाजारात आला असून १६GB रॅम + ५१२GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ८९,९९९/- ठेवण्यात आली आहे. विवो च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. सोबतच फ्लिपकार्ट, क्रोमा आणि रिलायंस डिजिटल या वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. 

फ्लिपकार्ट वरून जर तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेतला तर बॅंकेच्या ऑफर्स वर तुम्हांला तब्बल ७०००/- चा डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर अजून डिस्काउंट तुम्हांला मिळणार आहे. जर तुम्हांला हा स्मार्टफोन EMI वर घ्यायचा असेल तर फ्लिपकार्ट वर No Cost EMI द्वारे देखील तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकणार आहात. २४ महिन्यांच्या No Cost EMI प्लॅन मध्ये तुम्हांला ३७५०/- चा हप्ता भरावा लागेल. 

विवो X100 प्रो भारतात लॉन्च तारीख – Vivo X100 Pro Launch Date in India

विवो X100 प्रो हा स्मार्टफोन ४ जानेवारी २०२४ ला भारतात लॉन्च करण्यात आला आहे. विवो X100 सिरीज मध्ये दोन मॉडेल आहेत Vivo X100 आणि Vivo X100 Pro. हे दोन्ही स्मार्टफोन विवो च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हांला विकत घेता येणार आहे.

FAQ:

Vivo X100 Pro वैशिष्ट्य? Vivo X100 Pro specifications?

विवो X100 प्रो मध्ये MediaTek Dimensity 9300 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. विवो X100 प्रो चा हा कॅमेरा ZEISS APO प्रमाणित (Certified) टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. विवो X100 प्रो ला IP68 रेटींग असल्यामुळे पाणी आणि धूळ यापासून हा स्मार्टफोन सुरक्षित राहणार आहे. ३० मिनिटांसाठी १.५m खोल पाण्यात हा स्मार्टफोन सुरक्षित असेल असा कंपनीचा दावा आहे.

विवो X100 प्रो कॅमेरा? Vivo X100 Camera?

विवो X100 प्रो चा हा कॅमेरा ZEISS APO प्रमाणित (Certified) टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोन मधून काढलेले फोटोज् तुम्हांला एखाद्या DSLR ने काढल्यासारखे दिसतील. विवो X100 प्रो चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल असून दुसरा कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो आणि तिसरा कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. विवो X100 प्रो मध्ये 8K व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे. सोबतच सिनेमॅटिक मोड देखील मिळणार आहे. ३२ मेगापिक्सेलच्या सेल्फी कॅमेऱ्याने 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे.

विवो X100 प्रो प्रोसेसर? Vivo X100 Pro Processor?

विवो X100 प्रो मध्ये MediaTek Dimensity 9300 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. विवो X100 प्रो चा हा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर २,२४९,८५८ आहे.

विवो X100 प्रो ची भारतात किंमत? Vivo X100 Pro Price in India?

विवो X100 प्रो (Vivo X100 Pro) भारतीय बाजारात आला असून १६GB रॅम + ५१२GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ८९,९९९/- ठेवण्यात आली आहे. विवो च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. सोबतच फ्लिपकार्ट, क्रोमा आणि रिलायंस डिजिटल या वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. जर तुम्हांला हा स्मार्टफोन EMI वर घ्यायचा असेल तर फ्लिपकार्ट वर No Cost EMI द्वारे देखील तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकणार आहात. २४ महिन्यांच्या No Cost EMI प्लॅन मध्ये तुम्हांला ३७५०/- चा हप्ता भरावा लागेल. 

हे वाचा: Realme 12 Pro series: रियलमी १२ प्रो किंवा प्रो प्लस घेण्याआधी हे वाचा

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment