Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY): सहज नोकरी मिळवण्याचा एक पर्याय, तुम्ही देखील ८०००/- मिळवू शकता

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY)

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY): देशातील तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने प्रधानमंत्री कौशल विकास योजना बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येते आणि त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.

Table of Contents

या प्रमाणपत्राचा उपयोग करून तुम्ही रोजगार मिळवू शकणार आहात. आता पर्यंत देशातल्या बऱ्याच तरुणांनी या संधीचा फायदा घेत हे  प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवले आहे. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) प्रमाणपत्र म्हणजे काय?

१६ जुलै २०१५ साली प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तेव्हापासून असंख्य तरुण – तरुणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही, हे प्रशिक्षण पूर्ण पणे मोफत दिले जाते. कुठल्याही श्रेणीतील तरुण – तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रशिक्षणाचा कालावधी तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमावर अवलंबून असणार आहे. साधारण पणे १५० ते ३०० तासांच्या दरम्यान प्रशिक्षण कालावधी असू शकतो. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत निवडलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हांला प्रमाणपत्र दिले जाते जे तुम्ही स्किल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करू शकाल. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या नवीन आवृत्तीमध्ये म्हणजेच PMKVY 4.0 मध्ये मोफत प्रशिक्षणासोबतच लाभार्थ्यांना ८०००/- रुपयेही दिले जातात. ही केंद्र सरकारची योजना आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवक किंवा युवतीला त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाते.

हे प्रमाणपत्र तुम्ही घरी बसून देखील डाउनलोड करू शकता. डाउनलोड केलेलं प्रमाणपत्र तुम्ही शासनाच्या किंवा खासगी कंपनीमध्ये नोकरी अर्जासोबत जोडू शकता. शासनाकडून जे रोजगार मेळावे आयोजित केले जातात अश्याठिकाणी PMKVY प्रमाणपत्र खूपच उपयोगाला येते. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) अभ्यासक्रमांसाठी कोण पात्र आहे? Who is eligible for PMKVY courses?

जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा शैक्षणिक कार्यकाळात तुम्ही कॉलेज किंवा शाळा अर्धवट सोडली असेल तर तुम्ही या अभ्यासक्रमांसाठी पात्र आहात. तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (PMKVY) अभ्यासक्रमांसाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा वैध बँक खाते यापैकी एखादा पुरावा असणे बंधनकारक आहे. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) फायदे काय आहेत? What are the benefits of PMKVY?

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) शाळा/महाविद्यालयातून नुकतेच बाहेर पडलेल्या किंवा असे तरुण-तरुणी जे बेरोजगार आहेत अश्याना रोजगार मिळवून देण्याची संधी प्रदान करते. या योजनेमार्फत दिले जाणारे प्रशिक्षणाचे फ्रेमवर्क राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) प्रमाणे आहे.

हे प्रशिक्षण आर्थिक आणि डिजिटल साक्षरता तसेच सॉफ्ट स्किल्स आणि उद्योजकता प्रदान करते. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत मिळणारे प्रमाणपत्र सरकारी योजनेअंतर्गत असल्यामुळे देशातील कोणत्याही राज्यात हे प्रमाणपत्र नोकरी मिळवण्यासाठी वापरता येणार आहे. सरकारी प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता जास्त वाढते. 

PMKVY नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? What documents are required for PMKVY registration?

मतदार ओळखपत्र, बँक खाते पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो हि कागदपत्रे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) नोंदणीसाठी आवश्यक आहेत. pmkvyofficial.org ही प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची (PMKVY) अधिकृत वेबसाइट आहे.

जर तुम्हांला PMKVY प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे हे माहित नसेल तर पुढे दिलेली माहिती वाचा: – How to Download PMKVY Certificate?

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी स्किल इंडियाची अधिकृत वेबसाइट उघडावी, त्यांनतर लॉग इन करताना योग्य आणि खरी माहिती त्यामध्ये भरावी. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या डॅशबोर्ड मध्ये जाऊन प्रोफाइल ला क्लिक करा. प्रोफाइल मध्ये गेल्यावर तुम्हांला तुम्ही केलेला अभ्यासक्रम (Course) दिसेल, त्यावर क्लिक करून PMKVY प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे. डाउनलोड केलेल्या प्रमाणपत्राची प्रिंट काढून घ्यावी. 

FAQ:

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (PMKVY) अभ्यासक्रमांसाठी कोण पात्र आहे? Who is eligible for PMKVY courses?

जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा शैक्षणिक कार्यकाळात तुम्ही कॉलेज किंवा शाळा अर्धवट सोडली असेल तर तुम्ही या अभ्यासक्रमांसाठी पात्र आहात. तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (PMKVY) अभ्यासक्रमांसाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा वैध बँक खाते यापैकी एखादा पुरावा असणे बंधनकारक आहे. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे (PMKVY) फायदे काय आहेत? What are the benefits of PMKVY?

प्रधानमंत्री कौशल विकास योजना शाळा/महाविद्यालयातून नुकतेच बाहेर पडलेल्या किंवा असे तरुण-तरुणी जे बेरोजगार आहेत अश्याना रोजगार मिळवून देण्याची संधी प्रदान करते. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत मिळणारे प्रमाणपत्र सरकारी योजनेअंतर्गत असल्यामुळे देशातील कोणत्याही राज्यात हे प्रमाणपत्र नोकरी मिळवण्यासाठी वापरता येणार आहे. सरकारी प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता जास्त वाढते. 

PMKVY नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? What documents are required for PMKVY registration?

मतदार ओळखपत्र, बँक खाते पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो हि कागदपत्रे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण (PMKVY) नोंदणीसाठी आवश्यक आहेत. pmkvyofficial.org ही प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची (PMKVY) अधिकृत वेबसाइट आहे.

हे वाचा: Annasaheb Patil Loan Scheme: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना जाणून घ्या काय आहे हि योजना

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment