Annasaheb Patil Loan Scheme: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना जाणून घ्या काय आहे हि योजना 

Annasaheb Patil Loan Scheme

Annasaheb Patil Loan Scheme: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवक युवतींसाठी त्यांच्या उद्योगात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा काही योजना आपल्या राज्यात सरकारकडून राबविल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक योजना (Annasaheb Patil Loan Scheme) हि खासकरून आर्थिकरित्या मागासलेल्या युवक युवतींसाठी एक चांगली संधी आहे. या संधीचा उपयोग करून युवक युवतीं आपल्या व्यवसायाची सुरवात करू शकता. 

Table of Contents

अण्णासाहेब पाटील आर्थिक (Annasaheb Patil Loan Scheme) या योजने अंतर्गत सरकार १५ लाखांनपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. मराठा समाजातील नवउद्योजकांला मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाची स्थापना २ फेब्रुवारी २०१८ रोजी केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक या योजनेत काही नवीन बदल करण्यात आले. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजने मध्ये किती कर्ज दिले जाते? How much loan is given in Annasaheb Patil loan scheme?

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाकडून पूर्वी १० लाख पर्यंत कर्ज दिले जात होते आणि त्यावर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा म्हणून ३ लाख रुपये पर्यंत व्याज परतावा दिला जात होता. पण आता झालेल्या नवीन बदलानुसार २० मे २०२२ पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक योजने (Annasaheb Patil Loan Scheme) अंतर्गत लाभार्थ्यांना १५ लाखांन पर्यंत कर्ज दिले जाते आणि या कर्जावर साडेचार लाख रुपये पर्यंतचे व्याज परतावा दिला जाणार आहे.  अण्णासाहेब पाटील आर्थिक योजनेचा अर्ज करण्यासाठी म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना अश्या तीन प्रकारच्या योजना राबविल्या जातात. 

गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 10 ते 50 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. या कर्जाचा परतफेड कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, LLP, FPO अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार किंवा उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

कर्जासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे (Annasaheb Patil Loan Scheme Age Limit):

वयोमर्यादा ६० वर्षे, वार्षिक उत्पन्न मर्यादा ८लाख,  अण्णासाहेब पाटील आर्थिक योजने अंतर्गत लाभार्थ्यांना महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनांचा घेतलेला नसावा. 

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी (Annasaheb Patil Loan Scheme Terms & Conditions):

  • एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • दिव्यांगांकरिता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशनकार्डची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे.
  • व्यावसायिक कर्जासाठी उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराची कोणत्याही बँकेत थकबाकी नसावी. 
  • लाभार्थ्याने नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा मिळणार नाही.
  • गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार कमीत कमी इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेला असावा. 
  • या योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणारा व्यवसाय हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक आहे.
  • वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम त्या कर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Annasaheb Patil Loan Scheme Document List):

जर तुम्ही ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करणार असाल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे (Annasaheb Patil Loan Scheme online apply):

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल

जर तुम्ही बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज सादर करणार असाल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

व्याज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायाचा फोटो

कर्ज परतफेड न केल्यास:

लाभार्थ्यांकडून कर्जाची नियमित परतफेड होत नसल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. आवश्यक असल्यास कर्ज परतफेड न करणाऱ्या संस्थेवर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल व सदर कार्यवाहीचा खर्च संबंधित संस्थेकडून वसूल केला जाईल. त्याच सोबत थकीत कर्ज रक्कमेवर 4% अधिकचे दंडनीय व्याज आकारण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक योजना (Annasaheb Patil Loan Scheme) या अंतर्गत विविध बँकांनी आत्तापर्यंत ३१० जणांना कर्ज मंजुरी दिली असून १८ कोटी २८ लाख १२ हजार ४२५ रुपयांची कर्ज वाटप केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक योजनेचा (Annasaheb Patil Loan Scheme) अर्ज करण्यासाठी या संकेत स्थळावर जाऊन फॉर्म भरा.

FAQ:

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे? Annasaheb Patil Loan Scheme Document List?

जर तुम्ही ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करणार असाल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे:
आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना, बँक खात्याचे स्टेटमेंट, सिबिल रिपोर्ट, व्यवसाय-प्रकल्प अहवाल, व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र.

जर तुम्ही बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज सादर करणार असाल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे:
आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना, बँक खात्याचे स्टेटमेंट, सिबिल रिपोर्ट, व्यवसाय-प्रकल्प अहवाल, व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र.

व्याज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?Documents required for interest to be credited to your account?

बँक कर्ज मंजुरी पत्र, बँक स्टेटमेंट, उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना, व्यवसाय-प्रकल्प अहवाल, व्यवसायाचा फोटो.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजने मध्ये किती कर्ज दिले जाते? How much loan is given in Annasaheb Patil loan scheme?

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाकडून पूर्वी १० लाख पर्यंत कर्ज दिले जात होते आणि त्यावर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा म्हणून ३ लाख रुपये पर्यंत व्याज परतावा दिला जात होता. पण आता झालेल्या नवीन बदलानुसार २० मे २०२२ पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक योजने (Annasaheb Patil Loan Scheme) अंतर्गत लाभार्थ्यांना १५ लाखांन पर्यंत कर्ज दिले जाते आणि या कर्जावर साडेचार लाख रुपये पर्यंतचे व्याज परतावा दिला जाणार आहे.  अण्णासाहेब पाटील आर्थिक योजनेचा अर्ज करण्यासाठी म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.

हे वाचा: PMMVY – काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – Pradhan Mantri Matru Vandana Yojana

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment