Sukanya Samriddhi Yojana – (SSY): जाणून घ्या काय आहे सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana - SSY
Credit:iStockphoto/Poltu shyamal

Sukanya Samriddhi Yojana – SSY: सुकन्या समृद्धी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “बेटी बचाओ , बेटी पढाओ” या अभियानअंतर्गत २२ जानेवारी २०१५ रोजी देशभरात सुरु केली. हि योजना केंद्रशासनाने खास मुलींसाठी आणली आहे. सुकन्या समृद्धी योजना केंद्रशासनाची कमी गुंतवणुक असलेली योजना आहे.

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी,किंवा त्यांच्या लग्नासाठी त्यांचे पालक ह्या योजनेअंतर्गत पैसे गुंतवू शकतात. मुलींचे आई वडील राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून सुकन्या समृद्धी योजना ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत किंवा पोस्टात दरवर्षी २५०/- ते १. ५ लाख पर्यंतची गुंतवणूक करु शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana – SSY) मॅच्युरिटी मुलगी २१ वर्षांची झाली कि होते. ह्या योजनेचा कालावधी २१ वर्षे ईतकाच असतो. जरी ह्या योजनेचा कालावधी २१ वर्ष असला तरी खाते चालू केल्यापासून ते फक्त १५ वर्ष ह्या खात्यात पैसे भरायचे असतात. जर मुलीचे वय २१ पूर्ण व्हायच्या आधी मुलीचे लग्न झाले तर हे सुकन्या समृद्धी योजना खाते बंद होते. सुकन्या समृद्धी योजनेचि मॅच्युरिटी (मुलगी २१ वर्षांची झाल्यावर) पूर्ण होऊन सुद्धा खाते बंद नाही केले तरी हरकत नाही तुमच्या खात्यावरील रकमेवर बँक किंवा पोस्ट खात्याच्या चालू व्याजदरा प्रमाणे तुम्हाला व्याज मिळत राहते.

मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लकवर ५०% रक्कम तुम्हाला आधी काढता येऊ शकते. आयकर कायदा १९६१, कलम ८०-सी  (Income Tax Act, 1961 80C) या कायद्याअंतर्गत कर भरण्यात सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत करामध्ये सवलत (tax benefits) मिळवता येते. दरवर्षी किमान रुपये २५०/- सुकन्या समृद्धी खात्यात जमा केले गेले पाहिजेत, असे नाही केल्यास खाते बंद होते. तुम्ही हे खाते पुन्हा सुरू करू शकता मात्र दरवर्षी ५०/- रुपये दंड भरावा लागतो. खातेधारकाचा काही कारणास्तव मृत्य झाला तर खातेदारांच्या पालकांना व्याजासकट जमा झालेली रक्कम मिळते. सुकन्या समृद्धी बचत ठेव गुंतवणूक भारतातील सरकारची १००% सुरक्षित योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचा (Sukanya Samriddhi Yojana – SSY) व्याजदर कसा असतो (Sukanya Samriddhi Yojana interest rate):

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बदलानुसार कमी-जास्त होत असतो. तिमाही आधारावर भारत सरकार व्याजदर जाहीर करते.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana – SSY) २०२१ अटी (Sukanya samriddhi yojana details):

१. सुकन्या समृद्धी योजना २०२१ योजनेचा लाभ केवळ १० वर्षाखालील मुलींना घेता येऊ शकतो.

२. जर पालकांना दोन मुली असतील तरीसुद्धा पालक आपल्या दोन्ही मुलींसाठी दोन बचत खाती सुरू करू शकतात. तसेच जर प्रसूतीवेळी जुळ्या किंवा तीळया मुली झाल्या तरी त्यांच्याही नावे सुकन्या समृद्धी खाते उघण्याची अनुमती आहे.

३. सुकन्या समृद्धी बँक खात्यात पैसे रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक  किंवा बँकेत कोअर बँकिंग सिस्टमने रक्कम ट्रान्सफर करता येऊ शकते.

४. २१ वर्षानंतर सुकन्या समृद्धी खाते बंद केल्यावर पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी (Sukanya Samriddhi Yojana – SSY) लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे :

१. सुकन्या समृद्धी योजना फॉर्म

२. मुलीचा जन्म दाखला

३. आधारकार्ड

४.  पॅनकार्ड

५. मतदार ओळखपत्र

६. रेशनकार्ड, वीजबिल

वर सांगण्यात आलेली कागदपत्रे पालकांची असावीत. पालक म्हणजे आई-वडील किंवा कायदेशीररित्या मुलीचा सांभाळ करत असलेली व्यक्ती.
सुकन्या समृद्धी योजने साठी लागणारे खाते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत राष्ट्रीय बँकेत उघडले जाऊ शकते.

या योजने मध्ये काही बदल झाल्यास या पोस्ट मध्ये तो बदल केला जाईल.

FAQ:

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आपल्याला किती वर्षांसाठी पैसे भरावे लागणार? How many years should we pay for Sukanya Samriddhi Yojana?

सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana – SSY) मॅच्युरिटी मुलगी २१ वर्षांची झाली कि होते. ह्या योजनेचा कालावधी २१ वर्षे ईतकाच असतो. जरी ह्या योजनेचा कालावधी २१ वर्ष असला तरी खाते चालू केल्यापासून ते फक्त १५ वर्ष ह्या खात्यात पैसे भरायचे असतात.

सुकन्या करमुक्त आहे का? Is Sukanya tax free?

आयकर कायदा १९६१, कलम ८०-सी  (Income Tax Act, 1961 80C) या कायद्याअंतर्गत कर भरण्यात सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत करामध्ये सवलत (tax benefits) मिळवता येते.

सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी किमान किती पैसे जमा केले गेले पाहिजेत? What is the minimum amount that should be deposited in Sukanya Samriddhi account every year?

दरवर्षी किमान रुपये २५०/- सुकन्या समृद्धी खात्यात जमा केले गेले पाहिजेत, असे नाही केल्यास खाते बंद होते. तुम्ही हे खाते पुन्हा सुरू करू शकता मात्र दरवर्षी ५०/- रुपये दंड भरावा लागतो. खातेधारकाचा काही कारणास्तव मृत्य झाला तर खातेदारांच्या पालकांना व्याजासकट जमा झालेली रक्कम मिळते. सुकन्या समृद्धी बचत ठेव गुंतवणूक भारतातील सरकारची १००% सुरक्षित योजना आहे.

हे वाचा: PMMVY – काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – Pradhan Mantri Matru Vandana Yojana

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment