Honda Dio 110: फक्त ४,४६१/- भरून घरी घेऊन या तुमची आवडती स्कुटी

Honda Dio 110 Mileage

Honda Dio 110: होंडा च्या स्कुटी आणि बाईक ना देश भारत पसंती दिली जाते आणि होंडा कंपनी सुद्धा त्यांच्या ग्राहकांना नवीन नवीन मॉडेल लॉन्च करून भुरळ घालत असते. त्याच मॉडेल पैकी एक म्हणजे “होंडा डिओ” हि स्कुटी आहे. भारतातील तरुण मंडळींच्या नेहमीच हि स्कुटी पसंतीची राहिली आहे. होंडा ने आता नवीन होंडा डिओ ११० मॉडेल लॉन्च केले आहे.

होंडा डिओ ११० घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा ज्यामुळे तुम्हांला तुमचा निर्णय घेण्यासाठी मदत होईल. आम्ही नवीन होंडा डिओ ११० मध्ये काय काय देण्यात आले आले आहे सोबत होंडा डिओ ११० ची किंमत आणि जर तुम्हांला EMI वर स्कुटी घेण्याची इच्छा असेल तर किती EMI तुम्हांला भरावा लागेल हे सगळे या आर्टिकलमध्ये दिले आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे या नवीन होंडा डिओ ११० मध्ये.

होंडा डिओ ११० चे वैशिष्ट्य – Honda Dio 110 Specifications

नवीन होंडा डिओ ११० (Honda Dio 110) मध्ये बीएस ६ – १०९.५१ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे. नवीन होंडा डिओ ७.७५ bhp ची पॉवर आणि ९.०३ Nm चा टॉर्क जनरेट करते. होंडा डिओ ११० हि स्कुटी ३ मॉडेल आणि ९ रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. रंगासोबतच हि स्कुटी आकर्षक दिसण्यासाठी ग्राफिक्स चा देखील वापर करण्यात आला आहे. होंडा डिओ ११० चे वजन १०३ किलो आहे.

होंडा डिओ ११० चे फिचर्स – Honda Dio 110 Features

नवीन होंडा डिओ ११० च्या फिचर्स मध्ये पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ACG सायलेंट स्टार्टर, साइड स्टँड इंजिन इनहिबिटर (साइड स्टँडवर स्कुटी असेल तर इंजिन बंद होते), एक्सटर्नल फ्युएल फिलर कॅप, ड्युअल फंक्शन स्विच इंटिग्रेटिंग सीट आणि फ्युएल लिड ओपनर, फ्रंट पॉकेट आणि नवीन डीसी एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये स्कुटी मध्ये असलेल्या इंधनामध्ये किती किलोमीटर धावेल आणि किती मायलेज मिळेल हे दिसणार आहे. नवीन होंडा डिओ ११० मध्ये ३ वर्षांची वॉरंटी देण्यात येते.

होंडा डिओ ११० चे मायलेज – Honda Dio 110 Mileage

नवीन होंडा डिओ ११० (Honda Dio 110) मध्ये ५.३ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. होंडा डिओ ११० हि स्कुटी ४८ kmpl चा मायलेज देते. फुल टाकी मध्ये होंडा ऍक्टिवा २५४.४ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल. सोबतच १.३ लिटर ची राखीव इंधन क्षमता होंडा डिओ मध्ये देण्यात आली आहे.

होंडा डिओ ११० CBS ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहेत. नवीन होंडा डिओचे टायर ट्यूबलेस देण्यात आले आहेत ज्यामध्ये पुढील टायर १२ इंचाचा तर मागील टायर १० इंचाचा असणार आहे. नवीन होंडा डिओचे सस्पेन्शन पुढील बाजूस टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस युनिट स्विंग सस्पेन्शन देण्यात आले आहे. या सस्पेन्शनमुळे कच्या रस्त्यावर देखील आरामात प्रवास करता येणार आहे.

नवीन होंडा डिओ ११० भारतीय बाजारात प्रतिस्पर्धी बरेच असेल तरी Hero Pleasure Plus 110, Hero Maestro Edge 110 आणि TVS Jupiter 110 यांच्या सोबत होंडा डिओची थेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते.

Honda Dio 110 Price In India

होंडा डिओ ११० ची किंमत – Honda Dio 110 Price In India

होंडा डिओ ११० (Honda Dio 110) चे Dio Standard, Dio Deluxe आणि Dio H-Smart असे तीन मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. होंडा डिओ ११० च्या बेस मॉडेल Dio Standard ची ऑन रोड मुंबई ची किंमत ८९,२२७/- रुपये, Dio Deluxe ची ऑन रोड मुंबई ची किंमत ९३,७२७/- रुपये आणि Dio H-Smart ची ऑन रोड मुंबई ची किंमत ९७,६६६/- रुपये आहे.

होंडा डिओ ११० चा प्रति महिना हप्ता – Honda Dio 110 EMI

Dio Standard ची एक्स शोरूम किंमत ७३,८९६/- असून RTO ९३९१/- आणि विमा ५९४०/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ८९,२२७/- होते. होंडा डिओ ११० (Honda Dio110) EMI वर घेण्यासाठी ४४६१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ८४,७६६/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला ३०६१/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

Dio Deluxe ची एक्स शोरूम किंमत ७७,८९७/- असून RTO ९८४०/- आणि विमा ५९९०/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ९३,७२७/- होते. होंडा डिओ ११० (Honda Dio110) EMI वर घेण्यासाठी ४६८६/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ८९,०४१/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला ३२१५/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

Dio H-Smart ची एक्स शोरूम किंमत ८१,३९७/- असून RTO १०,२३३/- आणि विमा ६०३६/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ९७,६६६/- होते. होंडा डिओ ११० (Honda Dio110) EMI वर घेण्यासाठी ४८८३/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ९२,७८३/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला ३३५०/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

होंडा डिओ ११० च्या तुमच्या शहरातील किंमती आणि ऑफरशी संबंधित सर्व माहिती जवळच्या शोरूममध्ये भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हीं जाणून घेऊ शकता.

FAQ:

होंडा डिओ ११० चे मायलेज? Honda Dio 110 Mileage?

होंडा डिओ ११० हि स्कुटी ४८ kmpl चा मायलेज देते. नवीन होंडा डिओ ११० (Honda Dio 110) मध्ये ५.३ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये होंडा ऍक्टिवा २५४.४ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

होंडा डिओ ११० चे वजन? Honda Dio 110 Weight?

होंडा डिओ ११० चे वजन १०३ किलो आहे.

होंडा डिओ ११० ची किंमत? Honda Dio 110 Price In India?

होंडा डिओ ११० (Honda Dio 110) चे Dio Standard, Dio Deluxe आणि Dio H-Smart असे तीन मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. होंडा डिओ ११० च्या बेस मॉडेल Dio Standard ची ऑन रोड मुंबई ची किंमत ८९,२२७/- रुपये, Dio Deluxe ची ऑन रोड मुंबई ची किंमत ९३,७२७/- रुपये आणि Dio H-Smart ची ऑन रोड मुंबई ची किंमत ९७,६६६/- रुपये आहे.

हे वाचा: Toyota Hilux Champ: टोयोटाचा नवा स्वस्त पिकअप, टोयोटा फॉर्च्युनर होणार स्वस्त?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment