Tata Tiago CNG Automatic: टाटा ची मायलेज देणारी ऑटोमॅटिक कार, किंमत फक्त?

Tata Tiago CNG Automatic Mileage

Tata Tiago CNG Automatic: टाटा मोटर्स ने भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या Tata Tiago CNG मध्ये ऑटोमॅटिक (AMT) मॉडेल लॉन्च केले आहे. टाटा मोटर्सने CNG मॉडेल मध्ये ऑटोमॅटिक कार घेऊन येत एक मोठे पाऊल ऑटोमोबाईल क्षेत्रात टाकले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे बराच मोठा ग्राहक वर्ग CNG कडे वळला आहे. ग्राहकांना शहरातील ट्रॅफिक मध्ये लहान आणि ऑटोमॅटिक कार असेल तर ड्रायविंग करणे सुलभ होते. 

Tata Tiago CNG Automatic (AMT) मॉडेलमुळे कमी किंमतीत चांगला मायलेज देणारी ऑटोमॅटिक कार घेण्याची ईच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स गेल्या काही वर्षात त्यांच्या कार मध्ये आणि टेक्नोलाॅजीमध्ये वेग वेगळे प्रयोग करून एक उल्लेखनीय कामगीरी करत आहे. देशातील मोठा ग्राहकवर्ग स्वतःकडे खेचून घेण्यात टाटा मोटर्स ला यश आले आहे.

ज्या ग्राहकांना हि नवीन Tata Tiago CNG Automatic घेण्याची ईच्छा असेल अश्या ग्राहकांना कार निवडी साठी आम्ही हे आर्टिकल घेऊन आलो आहोत. या आर्टिकल मध्ये तुम्हांला टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक कारचे मॉडेल आणि त्यांच्या किंमतीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच जर तुम्हांला हि कार EMI वर घ्यायची असेल तर त्याची सुद्धा सविस्तर माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये दिली आहे. 

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक फिचर्स – Tata Tiago CNG Automatic Features

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक चे ४ व्हेरियंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. टाटा टियागो ला चार-स्टार Global NCAP सुरक्षितता रेटिंग सुद्धा मिळाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कार मध्ये २ एअरबॅग, ओव्हरस्पीड चेतावणी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), सीट बेल्ट चेतावणी, ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इंजिन इमोबिलायझर, सेंट्रल लॉकिंग, स्पीड सेन्सिंग दरवाजा लॉक आणि मार्गदर्शनासह रिवर्स कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले आहेत.  

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक इंजिन – Tata Tiago CNG Automatic Engine

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये १.२ लिटर, तीन सिलेंडर, रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन पाच-स्पीड AMT युनिट सह देण्यात आले आहे. हे १.२ लिटर चे इंजिन पेट्रोल मोड मध्ये ८५ BHP ची पॉवर आणि ११३ NM चा टॉर्क प्रदान करते तर सीएनजी मोड मध्ये ७२ BHP ची पॉवर आणि ९५ NM चा टॉर्क प्रदान करते. टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये ३५ लिटरची इंधनाची टाकी देण्यात आली आहे.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक ची लांबी ३७६५ mm, रुंदी १६७७ mm, उंची १५३५ mm, व्हीलबेस २४०० mm आणि ग्राउंड क्लिअरन्स १६८ mm देण्यात आला आहे. पुढील सस्पेंशन – स्वतंत्र, लोअर विशबोन, मॅकफर्सन (ड्युअल पाथ) स्ट्रट प्रकारचे असून मागील सस्पेंशन -हायड्रोलिक शॉक शोषकांवर कॉइल स्प्रिंग बसवलेले रियर ट्विस्ट बीम प्रकारचे देण्यात आले आहे. पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. पुढे आणि मागे १४ इंचाचे स्टील व्हील 175 / 65 R14 साईज मध्ये देण्यात आले आहे. 

Tata Tiago CNG Automatic Price

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक माइलेज – Tata Tiago CNG Automatic Mileage

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक १.२ लिटर, तीन सिलेंडर, रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन सीएनजी मोड मध्ये २८.०६ km प्रति kg च माइलेज देते. टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक १.२ लिटर, तीन सिलेंडर, रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन पेट्रोल मोड मध्ये १९ kmpl च माइलेज देते. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक किंमत – Tata Tiago CNG Automatic Price

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये XTA, XZA+, XZA+ dual-tone, आणि XZA NRG असे ४ व्हेरियंट येतात. XTA मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत ८.९६ लाख, XZA+ मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत ९.९९ लाख, XZA+ dual-tone मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत १०.१० लाख आणि XZA NRG मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत ९.९९ लाख ठेवण्यात आली आहे. 

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक हप्ता  – Tata Tiago CNG Automatic EMI 

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक XTA मॉडेल ची एक्स-शोरूम किंमत ७,८९,९००/-, नोंदणी (रजिस्ट्रेशन) फि ६१,४९८/- , विमा(इन्शुरन्स) ४३,०९३/- आणि इतर शुल्क २,०००/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ८,९६,४९१/- होते. हे मॉडेल EMI वर घेण्यासाठी १,८५,५८१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी ७,१०,९१०/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १५,१०४/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक XZA Plus मॉडेल ची एक्स-शोरूम किंमत ८,७९,९००/-, नोंदणी (रजिस्ट्रेशन) फि ७०,९८४/- , विमा(इन्शुरन्स) ४६,४०६/- आणि इतर शुल्क २,०००/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ९,९९,२९०/- होते. हे मॉडेल EMI वर घेण्यासाठी २,०७,३८०/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी ७,९१,९१०/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १६,८२५/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक XZA+ dual-tone मॉडेल ची एक्स-शोरूम किंमत ८,८९,९००/-, नोंदणी (रजिस्ट्रेशन) फि ७१,६९८/- , विमा(इन्शुरन्स) ४६,७७४/- आणि इतर शुल्क २,०००/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत १०,१०,३७२/- होते. हे मॉडेल EMI वर घेण्यासाठी २,०९,४६२/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी ८,००,९१०/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १७,०१६/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

जर तुम्हांला टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक या कार बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन किंवा शोरूम ला भेट देऊन ती मिळवू शकता.

FAQ:

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक फिचर्स? Tata Tiago CNG Automatic Features?

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक चे ४ व्हेरियंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. टाटा टियागो ला चार-स्टार Global NCAP सुरक्षितता रेटिंग सुद्धा मिळाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कार मध्ये २ एअरबॅग, ओव्हरस्पीड चेतावणी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), सीट बेल्ट चेतावणी, ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इंजिन इमोबिलायझर, सेंट्रल लॉकिंग, स्पीड सेन्सिंग दरवाजा लॉक आणि मार्गदर्शनासह रिवर्स कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले आहेत.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक इंजिन? Tata Tiago CNG Automatic Engine?

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये १.२ लिटर, तीन सिलेंडर, रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन पाच-स्पीड AMT युनिट सह देण्यात आले आहे. हे १.२ लिटर चे इंजिन पेट्रोल मोड मध्ये ८५ BHP ची पॉवर आणि ११३ NM चा टॉर्क प्रदान करते तर सीएनजी मोड मध्ये ७२ BHP ची पॉवर आणि ९५ NM चा टॉर्क प्रदान करते.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक किंमत? Tata Tiago CNG Automatic Price?

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये XTA, XZA+, XZA+ dual-tone, आणि XZA NRG असे ४ व्हेरियंट येतात. XTA मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत ८.९६ लाख, XZA+ मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत ९.९९ लाख, XZA+ dual-tone मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत १०.१० लाख आणि XZA NRG मॉडेल ची ऑन-रोड मुंबई ची किंमत ९.९९ लाख ठेवण्यात आली आहे.

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक XTA मॉडेल हप्ता? Tata Tiago CNG XTA EMI?

टाटा टियागो सीएनजी ऑटोमॅटिक XTA मॉडेल ची एक्स-शोरूम किंमत ७,८९,९००/-, नोंदणी (रजिस्ट्रेशन) फि ६१,४९८/- , विमा(इन्शुरन्स) ४३,०९३/- आणि इतर शुल्क २,०००/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ८,९६,४९१/- होते. हे मॉडेल EMI वर घेण्यासाठी १,८५,५८१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी ७,१०,९१०/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १५,१०४/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

हे वाचा: Kia Seltos Diesel Manual 2024: दमदार पॉवर आणि मायलेज देणारी कार?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment