Mahindra XUV 3XO: आधुनिक फिचर्सने भरलेली महिंद्राची नवीन कार, किंमत आणि EMI?

Mahindra XUV 3XO Features

Mahindra XUV 3XO: महिंद्रा कंपनीने XUV 3XO हि नवीन पाच सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात आणली आहे. महिंद्राने तब्बल २५ व्हेरियंट भारतीय बाजारात उपलब्ध केले आहेत. Mahindra XUV 3XO मध्ये ११९७ सीसी चे पेट्रोल आणि १४९७ सीसी चे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय यामध्ये उपलब्ध असणार आहेत. हि कार १६ कलर पर्यायांमध्ये मिळणार आहे. 

Mahindra XUV 3XO मध्ये ग्राहकांच्या गरजेप्रमाणे फिचर्स देण्यात आले आहेत. इंटीरियर आणि बाहेरील डिसाईन वर महिंद्राने चांगले काम केलेलं आहे. भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही ला चांगली पसंती मिळत असल्यामुळे महिंद्राची हि कार नक्कीच ग्राहकांच्या पसंतीला उतरेल.

जर तुम्हांला या कार बद्दल सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा आणि तुमच्या मित्र परिवारात देखील शेअर करा. चला तर जाणून घेऊया नवीन महिंद्रा कार आणि तिच्या किंमती बद्दल. 

महिंद्रा XUV 3XO फिचर्स – Mahindra XUV 3XO Features

महिंद्रा XUV 3XO मध्ये तब्बल २५ व्हेरियंट येतात.  XUV 3XO च्या NCAP सुरक्षितता रेटिंग बद्दल सध्यातरी कंपनीकडून माहिती मिळालेली नाही. या कार मध्ये ६ एअरबॅग, EBD सह ABS देखील देण्यात आला आहे. XUV 3XO मध्ये सी-आकाराचे एलईडी डीआरएल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललाईट्स, टेलगेटवर एलईडी लाईट बार, रूफ रेल, मागच्याबाजूस वाइपर देण्यात आले आहेत.

mahindra xuv 3xo interior

या कार मध्ये हिल होल्ड कंट्रोल देखील देण्यात आले आहे. XUV 3XO मध्ये १७ इंचाचे अलॉय व्हील मिळणार आहेत. लेव्हल २ ADAS सूट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मागील बाजूस एसी व्हेंट्स, 360-डिग्री कॅमेरा आणि कूल ग्लोव्ह बॉक्स सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

महिंद्रा XUV 3XO इंजिन – Mahindra XUV 3XO Engine

महिंद्रा XUV 3XO १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, १.२ लिटर TGDi पेट्रोल आणि १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन या तीन व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध असणार आहे. १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन ८२ kW ची पॉवर आणि २०० NM चा टॉर्क प्रदान करते, १.२ लिटर TGDi पेट्रोल इंजिन ९६ kW ची पॉवर आणि २३० NM चा टॉर्क प्रदान करते आणि १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन ८६ kW ची पॉवर आणि ३०० NM चा टॉर्क प्रदान करते.

महिंद्रा XUV 3XO डिसाईन – Mahindra XUV 3XO Design

महिंद्रा XUV 3XO चे डिसाईन आधुनिक बनवण्यात आले आहे. महिंद्रा XUV 3XO चे इंटीरियर देखील फिचर्स ने भेरलेलं बनवण्यात आले आहे. १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला असून अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले ला हा इंफोटेनमेंट सिस्टम सपोर्ट करणारा आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सोबत ऑटो होल्ड देखील या कार मध्ये मिळणार आहे. 

Mahindra XUV 3XO Design

महिंद्रा XUV 3XO च्या टॉप मॉडेल मध्ये सनरूफ देण्यात आले आहे. १७ इंचाचे अलॉय व्हील, सी-आकाराचे एलईडी डीआरएल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललाईट्स, टेलगेटवर एलईडी लाईट बार, रूफ रेल या नवीन कार मध्ये देण्यात आले आहे.

महिंद्रा XUV 3XO माइलेज – Mahindra XUV 3XO Mileage

महिंद्रा XUV 3XO चे १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मॅन्युअल इंजिन १९.३४ kmpl च माइलेज देते. १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन १८.०६ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल मॅन्युअल इंजिन २०.६ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल ऑटोमॅटिक इंजिन २१.२ kmpl च माइलेज देते. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.

महिंद्रा XUV 3XO किंमत – Mahindra XUV 3XO Price

महिंद्रा XUV 3XO चे २५ व्हेरियंट भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महिंद्रा XUV 3XO च्या सर्व व्हेरियंटच्या किंमती पुढील प्रमाणे आहेत.

MX1 1.2 L TCMPFi₹ ८.८२ लाख
MX2 Pro 1.2 L TCMPFi₹ १०.५७ लाख
MX3 1.2 L TCMPFi₹ ११.१५ लाख
MX3 Pro 1.2 L TCMPFi₹ ११.७२ लाख
MX2 Pro 1.2 L TCMPFi AT₹ ११.७२ लाख
MX2 1.5 Turbo Diesel₹ ११.९२ लाख
MX2 Pro 1.5 Turbo Diesel₹ १२.६० लाख
AX5 1.2 L TCMPFi₹ १२.७४ लाख
MX3 1.2 L TCMPFi AT₹ १३.०९ लाख
MX3 1.5 Turbo Diesel₹ १३.२० लाख
MX3 Pro 1.2 L TCMPFi AT₹ १३.६८ लाख
MX3 Pro 1.5 Turbo Diesel₹ १३.७९ लाख
MX3 1.5 Turbo Diesel Autoshift Plus₹ १४.१५ लाख
AX5L 1.2 TGDi₹ १४.२६ लाख
AX5 1.2 L TCMPFi AT₹ १४.४९ लाख
AX5 1.5 Turbo Diesel₹ १४.६२ लाख
AX7 1.2 TGDi₹ १४.८५ लाख
AX5 1.5 Turbo Diesel Autoshift Plus₹ १५.५८ लाख
AX5L 1.2 TGDi AT₹ १६.०१ लाख
AX7 1.5 Turbo Diesel₹ १६.५३ लाख
AX7L 1.2 TGDi₹ १६.६० लाख
AX7 1.2 TGDi AT₹ १६.६० लाख
AX7 1.5 Turbo Diesel Autoshift Plus₹ १७.४८ लाख
AX7L 1.5 Turbo Diesel₹ १८.०७ लाख
AX7L 1.2 TGDi AT₹ १८.३९ लाख

वरील किंमती या ऑन रोड मुंबईच्या असून तुमच्या शहराप्रमाणे या कार च्या ऑन रोड किंमती मध्ये बदल होणार आहे.

महिंद्रा XUV 3XO चा प्रति महिना हप्ता – Mahindra XUV 3XO EMI

महिंद्रा XUV 3XO च्या बेस मॉडेलची (MX1 1.2 L TCMPFi) एक्स शोरूम किंमत ७,४९,०००/- असून, RTO शुल्क ८९,१३७/-, विमा ४१,५८८/- आणि इतर शुल्क २,०००/-  मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ८,८१,७२५/- होते. महिंद्रा XUV 3XO बेस मॉडेल EMI वर घेण्यासाठी २,०७,६२५/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी ६,७४,१००/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १४,३२२/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

महिंद्रा XUV 3XO च्या टॉप मॉडेलची (AX7L 1.2 TGDi AT) एक्स शोरूम किंमत १५,४९,०००/- असून, RTO शुल्क २,०१,८३७/-, विमा ७१,०३०/- आणि इतर शुल्क १७,४९०/-  मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत १८,३९,३५७/- होते. महिंद्रा XUV 3XO बेस मॉडेल EMI वर घेण्यासाठी ४,४५,२५७/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी १३,९४,१००/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला २९,६२०/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

या मध्ये आम्ही फक्त बेस आणि टॉप मॉडेल च्या EMI ची माहिती दिली आहे, इतर मॉडेल च्या माहिती साठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला किंवा शोरूम ला भेट द्या.

या कार बद्दल नवीन माहिती मिळाली कि वेळोवेळी या आर्टिकल मध्ये बदल केले जातील. जर तुम्हांला Mahindra XUV 3XO बद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ती मिळवू शकता.

FAQ:

महिंद्रा XUV 3XO चे वैशिष्ट्य? Mahindra XUV 3XO Specifications?

Mahindra XUV 3XO मध्ये ग्राहकांच्या गरजेप्रमाणे फिचर्स देण्यात आले आहेत. महिंद्राने तब्बल २५ व्हेरियंट भारतीय बाजारात उपलब्ध केले आहेत. Mahindra XUV 3XO मध्ये ११९७ सीसी चे पेट्रोल आणि १४९७ सीसी चे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय यामध्ये उपलब्ध असणार आहेत. हि कार १६ कलर पर्यायांमध्ये मिळणार आहे. 

महिंद्रा XUV 3XO चे मायलेज? Mahindra XUV 3XO Mileage?

महिंद्रा XUV 3XO चे १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मॅन्युअल इंजिन १९.३४ kmpl च माइलेज देते. १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन १८.०६ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल मॅन्युअल इंजिन २०.६ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल ऑटोमॅटिक इंजिन २१.२ kmpl च माइलेज देते. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.

महिंद्रा XUV 3XO ची किंमत? Mahindra XUV 3XO Price In India?

महिंद्रा XUV 3XO च्या बेस मॉडेलची (MX1 1.2 L TCMPFi) एक्स शोरूम किंमत ७,४९,०००/- असून, RTO शुल्क ८९,१३७/-, विमा ४१,५८८/- आणि इतर शुल्क २,०००/-  मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ८,८१,७२५/- होते. महिंद्रा XUV 3XO च्या टॉप मॉडेलची (AX7L 1.2 TGDi AT) एक्स शोरूम किंमत १५,४९,०००/- असून, RTO शुल्क २,०१,८३७/-, विमा ७१,०३०/- आणि इतर शुल्क १७,४९०/-  मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत १८,३९,३५७/- होते.

हे वाचा: Royal Enfield Shotgun 650 बॉबर स्टाईल बाईक, किंमत आणि EMI?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment