Adani Group: अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी!

Why did Adani Group get this loan?

Adani Group: गौतम अदानींच्या (Gautam Adani) अदानी समूहाला अमेरिकन सरकारकडून 553 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. श्रीलंकेत कंटेनर टर्मिनल उभारण्यासाठी हे कर्ज अदानी समूहाला अमेरिकन सरकारकडून देण्यात आले आहे.

हे कर्ज देण्यापूर्वी अदानी समूहावर झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg research) आरोपांची अमेरिकेने चौकशी केली आहे असे अमेरिकन एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात शेअर्सच्या किमतींशी छेडछाड करून गुंतवणूकदारांची फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या अहवालानंतर गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचबरोबर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर आरोप केल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहाचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलर्सनी घसरले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला होता. परंतु आता ह्या बातमीमुळे बातमी अदानी समूहाने कम बॅक करत गुंतवणूकदारांना देखील दिलासा दिला आहे. 

हिंडेनबर्ग संशोधन म्हणजे काय? What is Hindenburg Research?

What is Hindenburg Research

हिंडेनबर्ग ही एक अमेरिकेतील गुंतवणूक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटवरील डेटाचे विश्लेषण करते. नाथन अँडरसन यांनी २०१७ साली हिंडेनबर्ग या संस्थेची स्थापना केली आहे. १९३७ मध्ये एका जर्मन प्रवासी विमानाला आग लागली होती आणि त्यामध्ये ३५ लोकांचा मृत्यू झाला होता त्यावरूनच या संस्थेचं नाव हिंडेनबर्ग ठेवण्यात आले. या संस्थेमार्फत विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर लक्ष ठेवण्यात येते. या संस्थेचा अहवाल काही मुद्यांवर अवलंबून असतो ज्यामध्ये मोठ्या कंपनीमधील शेअर मार्केटमधले आर्थिक गैरव्यवहार, स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यामधल्या चुकीच्या नोंदी यांचा समावेश आहे. या आणि अश्याप्रकारच्या काही बाबी वर संशोधन करून ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ कंपनी सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. 

अदानी समूहाच्या (Adani Group) व्यतिरिक्त या आधी हिंडेनबर्गने निकोला, क्लोव्हर हेल्थ, कांडी आणि लॉर्डस्टाउन मोटर्स यांच्या सह तब्बल १६ कंपन्यांचे अहवाल सादर केले आहेत. 

अदानी समूहाला (Adani Group) मिळालेल्या या कर्जामुळे आता तरी या कंपनीवरील डोकेदुखीचे सावट दूर झाले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने न्यायालय मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे अदानी-हिंडेनबर्ग संशोधनाच्या मुद्द्यावर सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही असे सांगितले होते. त्यामुळे आता शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 

अदानी समूहाला हे कर्ज का मिळले?

श्रीलंकेमध्ये चीन चे वाढणारे वर्चस्व लक्षात घेऊन अमेरिकेने भारतासोबत संयुक्त रित्या काम करण्याचे ठरवले आणि त्या अंतर्गत श्रीलंकेमध्ये एक नवीन बंदर उभारण्याचे ठरले. या बंदर उभारणीचे काम अदानी समूहाला (Adani Group) मिळाले आहे. याच कामासाठी अमेरिकन सरकारने इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) यांच्या कडून 553 दशलक्ष डॉलर्स चा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने अदानी समूहावर (Adani Group) झालेल्या आरोपांची चौकशी करूनच हे कर्ज अदानी समूहाला मंजूर केल्याचे एक अधिकाऱ्याने ब्लूमबर्गला दिलेल्या माहितीत सांगितले आहे. अदानी पोर्ट्स आणि एसईझेड (Adani Ports & SEZ) आणि श्रीलंकेच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या उपकंपनीशी कोणताही सबंध नसल्याचे तपासात आढळून आले आहे. 

येणाऱ्या काळात हिंडेनबर्ग कडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल परंतु तूर्तास तरी अदानी समूहामध्ये (Adani Group) गुंतवुणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे हे खरे.

FAQ:

हिंडेनबर्ग संशोधन म्हणजे काय? What is Hindenburg Research?

हिंडेनबर्ग ही एक अमेरिकेतील गुंतवणूक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटवरील डेटाचे विश्लेषण करते. नाथन अँडरसन यांनी २०१७ साली हिंडेनबर्ग या संस्थेची स्थापना केली आहे. १९३७ मध्ये एका जर्मन प्रवासी विमानाला आग लागली होती आणि त्यामध्ये ३५ लोकांचा मृत्यू झाला होता त्यावरूनच या संस्थेचं नाव हिंडेनबर्ग ठेवण्यात आले. या संस्थेमार्फत विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर लक्ष ठेवण्यात येते. या संस्थेचा अहवाल काही मुद्यांवर अवलंबून असतो ज्यामध्ये मोठ्या कंपनीमधील शेअर मार्केटमधले आर्थिक गैरव्यवहार, स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यामधल्या चुकीच्या नोंदी यांचा समावेश आहे. या आणि अश्याप्रकारच्या काही बाबी वर संशोधन करून ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ कंपनी सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. 

हिंडेनबर्गने अदानी समूहावर कुठला आरोप केला होता? What was Hindenburg’s charge against Adani group?

हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात शेअर्सच्या किमतींशी छेडछाड करून गुंतवणूकदारांची फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या अहवालानंतर गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचबरोबर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर आरोप केल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहाचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलर्सनी घसरले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला होता.

हे वाचा: Toyota Hilux Champ: टोयोटाचा नवा स्वस्त पिकअप, टोयोटा फॉर्च्युनर होणार स्वस्त?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment