Kia Ray EV: Tata आणि MG ला टक्कर देण्यासाठी येत आहे Kia ची नवीन इलेक्ट्रिक कार

Kia Ray EV range

Kia Ray EV: शहरामध्ये वाढणारे ट्रॅफिक आणि पेट्रोल-डिझेल चे वाढणारे दर या मुळे आपण सर्वच वैतागले आहात का? छोट्या मोठ्या कामासाठी तुम्हांला तुमची कार काढताना ट्रॅफिक आणि पेट्रोल-डिझेल चे वाढणारे दर डोळ्यासमोर येतात का? तर आता तुमच्यासाठी खूषखबर Kia तुमच्यासाठी एक इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे.

Kia Ray EV या नावाने हि कार बाजारात येणार आहे. Kia Ray EV हि कार एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार असणार आहे. हि कार कॉम्पॅक्ट असल्यामुळे तुमचा ट्रॅफिक चा प्राब्लेम दूर होईलच सोबत इलेक्ट्रिक कार असल्यामुळे तुमच्या खिश्याला देखील परवडणारी असणार आहे. जाणून घेऊया या कार मध्ये Kia काय काय घेऊन येत आहे.

किया रे ईव्ही इंटीरियर आणि एक्सटीरियर Kia Ray EV Interior & Exterior

Kia Ray EV बनवताना Kia इंजिनिअर्सनी छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. किआ रे ईवी जरी कॉम्पॅक्ट कार असली तरी जागेचा वापर चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे ज्यामुळे लेगस्पेस ची कमी तुम्हांला जाणवणार नाही आणि लांबच्या ठिकाणी जाताना तुमचा प्रवास आनंददायी होणार आहे. इंटीरियर मध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे सोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन चार्जिंग सारख्या सुविधा मिळणार आहेत. किआ रे ईवी च्या लुक मध्ये भर देण्यात कारचे हेडलॅम्प, स्लीक टेललाइट्स आणि मस्क्युलर बंपर कुठेही कमी पडताना दिसत नाही आहेत.

किआ रे ईवी बॅटरी आणि रेंज – Kia Ray EV Battery and range

Kia Ray EV हि कार १६.४ kWh आणि ३५.५ kWh अश्या दोन बॅटरी पर्यायांसह बाजारात येणार आहे. १६.४ kWh बॅटरी असणारे मॉडेल फुल चार्ज मध्ये १३८ किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. ३५.५ kWh बॅटरी असणारे मॉडेल फुल चार्ज मध्ये तब्बल २३३ किलोमीटरपर्यंतची रेंज देणार आहे ज्यामुळे लांबचा पल्ला गाठण्यासाठी मदत होणार आहे. कंपनी ने दिलेली रेंज आणि तुम्ही चालवत असताना ची रेंज या मध्ये फरक असू शकतो कारण किती स्पीड मध्ये कार चालणार त्यावर बॅटरी चा वापर ठरणार आहे.

किआ रे ईवी या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ३५.५ kWh क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जरने फक्त ३० मिनिटांत ५० टक्के चार्जिंग होणार आहे असा कंपनीचा दावा आहे. किआ रे ईवी कारची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी ६ तास घेते. इलेक्ट्रिक कार वापरताना तुम्ही जाणाऱ्या मार्गावर कार चार्जिंग चे स्टॉप आहेत कि नाही हे एकदा पडताळून पहिले पाहिजे, जेणे करून तुमचा प्रवास सुखकर होईल.

किया रे EV कामगिरी – Kia Ray EV Performance

Kia Ray EV हि कार शहरी आणि ग्रामीण भागासाठीच बनवण्यात आली आहे, त्यासाठी लागणारी पुरेशी पॉवर या कार मध्ये देण्यात आली आहे. हायवे वर ह्या कार ची पॉवर तुम्हांला कमी जाणवू शकेल. १६.४ kWh बॅटरी असणारे मॉडेल ६८ hp ची पॉवर देणार आहे तर ३५.५ kWh बॅटरी असणारे मॉडेल ८६ hp ची पॉवर देईल. ० ते १०० चा स्पीड फक्त १२ सेकंदात किआ रे ईवी हि कार गाठते एवढी वेगवान हि कार आहे. हि कार वजनाने हलकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील खडबडीत रस्त्यांवर देखील हि कार सहजपणे धावणारी आहे. किआ रे ईवी चे सस्पेन्शन चांगले असल्यामुळे खडबडीत रस्त्यांवर देखील खूप आरामदायक प्रवास आपल्याला करायला मिळणार आहे. एकंदरीत पाहता हि किआ रे ईवी छोटा पॉकेट मोठा धमाका असणार आहे.

Kia Ray EV range

किआ रे ईवी ची भारतात किंमत – Kia Ray EV Price in India

भारतात Kia Ray EV ची किंमत किती असणार आहे हे अजूनही कंपनी ने जाहीर केले नसले तरी मीडिया रिपोर्ट नुसार किआ रे ईवी दोन बॅटरी व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. छोटी बॅटरी असलेल्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १६ लाख रुपयांपासून सुरू होईल तर मोठी बॅटरी असलेल्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १७ लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. या किंमती हि कार भारतीय बाजारात येई पर्यंत कमी जास्त होऊ शकतात. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा लाभ घेतला तर या किंमतीमध्ये अजून फरक पडू शकतो.

किआ रे ईवी प्रतिस्पर्धी – Kia Ray EV Rival

किआ रे ईवी चे भारतीय बाजारात प्रतिस्पर्धी Tata Tiago EV आणि MG Comet EV असणार आहेत. सध्या या दोन्ही कार भारतीय बाजारात विकल्या जात आहेत. Tata Tiago EV आणि MG Comet EV चे वर्चस्व Kia Ray EV कसे मोडून काढते ते येणार काळच ठरवणार आहे.

FAQ:

किआ रे ईवी रेंज? Kia Ray EV range?

Kia Ray EV हि कार १६.४ kWh आणि ३५.५ kWh अश्या दोन बॅटरी पर्यायांसह बाजारात येणार आहे. १६.४ kWh बॅटरी असणारे मॉडेल फुल चार्ज मध्ये १३८ किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. ३५.५ kWh बॅटरी असणारे मॉडेल फुल चार्ज मध्ये तब्बल २३३ किलोमीटरपर्यंतची रेंज देणार आहे ज्यामुळे लांबचा पल्ला गाठण्यासाठी मदत होणार आहे. कंपनी ने दिलेली रेंज आणि तुम्ही चालवत असताना ची रेंज या मध्ये फरक असू शकतो कारण किती स्पीड मध्ये कार चालणार त्यावर बॅटरी चा वापर ठरणार आहे.

किआ रे ईवी ची किंमत? Kia Ray EV Price in India?

भारतात Kia Ray EV ची किंमत किती असणार आहे हे अजूनही कंपनी ने जाहीर केले नसले तरी मीडिया रिपोर्ट नुसार किआ रे ईवी दोन बॅटरी व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. छोटी बॅटरी असलेल्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १६ लाख रुपयांपासून सुरू होईल तर मोठी बॅटरी असलेल्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १७ लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. या किंमती हि कार भारतीय बाजारात येई पर्यंत कमी जास्त होऊ शकतात. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा लाभ घेतला तर या किंमतीमध्ये अजून फरक पडू शकतो.

हे वाचा: New Maruti EVX: मारुती सुझुकीची नवीन EVX, एका चार्जमध्ये ५५० किमीची रेंज

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment