New Ford Endeavour: फोर्ड एंडेव्हर भारतात पुन्हा विक्रीसाठी सज्ज?

New Ford Endeavour 2025 Price in India

New Ford Endeavour: फोर्ड इंडियाने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत त्यांची सर्वोत्तम कार फोर्ड एंडेव्हर विक्रीसाठी आण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ अमेरिकन असलेल्या फोर्डने २०२१ मध्ये भारतीय बाजारातून काढता पाय घेतला होता. परंतु सूत्रांच्या माहिती नुसार फोर्डने भारतात नव्याने पेटंट दाखल केले असून चेन्नई प्लांटमध्ये नवीन फोर्ड एंडेव्हर चे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात दाखल केलेल्या फोर्ड एंडेव्हरच्या नवीन पेटंटचे डिजाईन थायलंडच्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोर्ड एव्हरेस्ट सारखे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. फोर्ड एव्हरेस्ट भारतीय बाजारपेठेत फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) नावानेच विकली जाणार आहे. २०२१ मध्ये फोर्ड एंडेव्हर मॉडेल विक्री साठी बंद झाले तेव्हा पासून सेकंड हँड मार्केट मध्ये या कार ची मागणी जास्तच वाढली आहे.

सूत्रांच्या माहीती नुसार नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) जरी चेन्नईच्या फॅक्टरी मध्ये उत्पादन केली जाणार असे असली तरी काही सुत्रांकडून असे देखील समजते कि कदाचित नवीन फोर्ड एंडेव्हर भारतात आयात केली जाऊ शकेल. सूत्रांच्या माहिती नुसार प्रति वर्षी २,५०० युनिट भारतात आयात करण्याचा कंपनीचा मानस आहे.

असे जर झाले तर नवीन फोर्ड एंडेव्हर च्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण भारतात लागणाऱ्या टॅक्स मुळे आयात केलेल्या कार च्या किंमतीमध्ये नेहमीच वाढ झालेली आपण बघितले आहे. त्यामुळे नवीन फोर्ड एंडेव्हर भारतामध्ये तिची मुख्य प्रतिस्पर्धी असेल्या फॉर्च्यूनर पेक्षा देखील महाग विकली जाऊ शकते. सध्या वर्तमानात फोर्ड कडे भारतीय बाजारात साणंद आणि चेन्नई या दोन ठिकाणी प्लांट आहेत. त्यामधील साणंदचा प्लांट २०२२ मध्ये टाटा मोटर्सनी विकत घेतला असून चेन्नईचा प्लांट बॅकअप साठी ठेवण्यात आला आहे.

New Ford Endeavour 2025 Price in India

नवीन फोर्ड एंडेव्हर डिजाईन – New Ford Endeavour 2025 Design

नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) च डिजाईन जागतिक बाजारात विकल्या जाणाऱ्या रेंजर पिकअप ट्रकच्या प्लेटफार्म वर बनवण्यात येणार आहे. नवीन फोर्ड एंडेव्हर लैडर फ्रेम आर्किटेक्चर वर आधारित असून एग्रेसिव लुक आणि डिजाईन सोबतच पावरफुल इंजिन चे ऑपशन आपल्याला बघायला मिळणार आहेत.

नवीन फोर्ड एंडेव्हरचा पुढील भाग आंतराष्ट्रीय बाजारात फोर्ड एवरेस्ट नावाने विकल्या जाणाऱ्या कार सारखा असणार आहे असे सूत्रांचे सांगणे आहे. सध्या भारतात उपलब्ध असणाऱ्या फोर्ड एंडेव्हर पेक्षा नवीन फोर्ड एंडेव्हर अधिक आकर्षित असेल ह्यात काही शंका नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने फॉर्च्यूनर सोबत स्पर्धा करण्यासाठी फोर्ड एंडेव्हर येणार हे नक्कीच.

नवीन फोर्ड एंडेव्हर फिचर्स – New Ford Endeavour 2025 Features list

फोर्ड इंडियाने जरी अधिकृत पणे हे जाहीर केले नसले तरी जाणकारांच्या मते नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) फिचर्स ने भरलेली असणार आहे ज्यामध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम १२.३ इंचाचा स्क्रीन सोबतच १२.४ इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिला जाईल. ADAS सारखे एडवांस फिचर्स देखील नवीन फोर्ड एंडेव्हर मध्ये दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीयांच्या पसंतीचे सनरूफ देखील नवीन फोर्ड एंडेव्हर मध्ये मिळणार आहे. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या फॉर्च्यूनर मध्ये या पैकी कुठलेच फिचर्स उपलब्ध नाही आहेत त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ड या नवीन फिचर्सने भरून फोर्ड एंडेव्हर भारतात विक्री साठी आणेल यात काही शंका नाही.

New Ford Endeavour 2025 Price in India

नवीन फोर्ड एंडेव्हर इंजिन – New Ford Endeavour 2025 Engine

नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) चे इंजिन फोर्ड रेंजर चे वापरले जाऊ शकते. ज्यामध्ये २.२ लिटर चे टर्बो डिझेल आणि ३.० लिटर चे V6 टर्बो डिझेल असण्याची दाट शक्यता आहे. नवीन फोर्ड एंडेव्हर भारतीय बाजारात 2WD आणि 4WD मध्ये असणार आहेत. 4WD सर्वच मॉडेल मध्ये उपलब्ध असणार कि नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. गेअर बॉक्स बद्दल बोलायचे तर सहा स्पीड मॅनुअल आणि दहा स्पीड चा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळणार आहे.

नवीन फोर्ड एंडेव्हर ची भारतात किंमत – New Ford Endeavour 2025 Price in India

नवीन फोर्ड एंडेव्हर चेन्नईच्या फॅक्टरी मध्ये उत्पादन केली गेली तर तिची किंमत कमी असू शकेल परंतु जर फोर्ड एंडेव्हर भारतात आयात केली गेली तर भारतीय टॅक्स मुळे तिची किंमत ६० लाखांपासून सुरु होईल. सध्या भारतात विकली जाणारी फोर्ड एंडेव्हरची मुख्य प्रतिस्पर्धी असेल्या फॉर्च्यूनरची एक्स शोरूम किंमत ३३ लाखांपासून सुरु होते आणि टॉप मॉडेल ५२ लाखांपर्यंत जाते.

नवीन फोर्ड एंडेव्हर भारतात लॉन्च होण्याची तारीख – New Ford Endeavour 2025 Launch Date in India

सूत्रांच्या माहिती नुसार नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) २०२५ पर्यंत भारतीय बाजारात विक्री साठी उपलब्ध होईल. आता जरी अधिकृत रित्या या माहितीची घोषणा झाली नसली तरी लवकरच फोर्ड इंडिया याची घोषणा करू शकेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. फोर्ड एंडेव्हर चा भारतातील चाहता वर्ग नवीन फोर्ड एंडेव्हर ची आतुरतेने वाट बघेल हे नक्की.

FAQ:

नवीन फोर्ड एंडेव्हर ची भारतात किंमत? New Ford Endeavour 2025 Price in India?

नवीन फोर्ड एंडेव्हर चेन्नईच्या फॅक्टरी मध्ये उत्पादन केली गेली तर तिची किंमत कमी असू शकेल परंतु जर फोर्ड एंडेव्हर भारतात आयात केली गेली तर भारतीय टॅक्स मुळे तिची किंमत ६० लाखांपासून सुरु होईल. सध्या भारतात विकली जाणारी फोर्ड एंडेव्हरची मुख्य प्रतिस्पर्धी असेल्या फॉर्च्यूनरची एक्स शोरूम किंमत ३३ लाखांपासून सुरु होते आणि टॉप मॉडेल ५२ लाखांपर्यंत जाते.

नवीन फोर्ड एंडेव्हर इंजिन? New Ford Endeavour 2025 Engine?

नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) चे इंजिन फोर्ड रेंजर चे वापरले जाऊ शकते. ज्यामध्ये २.२ लिटर चे टर्बो डिझेल आणि ३.० लिटर चे V6 टर्बो डिझेल असण्याची दाट शक्यता आहे. नवीन फोर्ड एंडेव्हर भारतीय बाजारात 2WD आणि 4WD मध्ये असणार आहेत.

नवीन फोर्ड एंडेव्हर भारतात लॉन्च होण्याची तारीख? New Ford Endeavour 2025 Launch Date in India?

सूत्रांच्या माहिती नुसार नवीन फोर्ड एंडेव्हर (New Ford Endeavour) २०२५ पर्यंत भारतीय बाजारात विक्री साठी उपलब्ध होईल. आता जरी अधिकृत रित्या या माहितीची घोषणा झाली नसली तरी लवकरच फोर्ड इंडिया याची घोषणा करू शकेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हे वाचा: Hyundai Creta Facelift Booking: बुकिंग सुरू, २५,०००/- रुपये भरून बुक करा नवीन क्रेटा

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment